Mumbai Mahanagar Palika Bharti 2024
◾️1700 लिपिक
◾️450 अग्निशामक
◾️400 अभियंता
🔖 BMC च्या लिपिक पदाच्या 1700 Vacency सुध्दा लवकरच येणार आहेत ..
पुढील १५ ते २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रसिद्ध होईल
भरतीसंदर्भात आरक्षण तसेच बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून, ती अंतिम टप्यात आहे. पुढील १५ ते २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रसिद्ध होईल. भरतीसाठी सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील असा अंदाज आहे. ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया तसेच निकाल यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च आहे.
■ महापालिकेत १,१०० लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गंत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त होतील. तर १७०० लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
■ मुंबई अग्निशमन दलात ९१० अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून, त्यापैकी ५०७ जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. येत्या काही महिन्यांत आणखी सुमारे ४५० जवानांची भरती केली जाणार आहे.
■ तर ४०० हून अधिक अभियंत्यांचीही भरती केली जाणार असून त्या प्रक्रियेसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

